Marathi Rajshabha 2023
ज्येष्ठ कवी वि.वा.शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस ‘मराठी राजभाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला
जातो. मराठी भाषेची गौरवशाली परंपरा जपण्यासाठी आणि तिचे संवर्धन करण्यासाठी मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून KBS/KMS
ग्रंथालयात २७ फेब्रुवारी २०२३ रोजी मराठी राजभाषा दिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.
त्यानिमित्ताने ग्रंथालयामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते “ढोलताशांच्या
गजरात ग्रंथ दिंडी”. या दिवशी विध्यार्थी आणि प्राध्यापक वर्गाने पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती. कार्यक्रमाची सुरुवात
दीप प्रज्वलन करून करण्यात आली. विद्यार्थ्यांनी थोर समाज सुधारकांना मानवंदना दिली. तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे ही
आयोजन करण्यात आले होते.